योग्य वातावरण नसल्याने कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
नाशिकमध्ये आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. मात्र सातपैकी सहा रॉकेटचा मारा अयशस्वी झाल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग तात्पुरता थांबवण्यात आलाय. सायगावात ७ रॉकेटमधून आकाशातील ढगांवर मारा करण्यात आला. रॉकेटमधल्या केमिकलसोबत ढगांशी रासायनिक प्रक्रीया होते. त्यानंतर कृत्रिम पाऊस पडतो, मात्र ४ रॉकेट कोसळली आणि ३ रॉकेट पाऊस पाडण्यात अयशस्वी झालीत. योग्य वातावरण नसल्याने प्रयोग अयशस्वी झाल्याचं समजतंय.